आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी आणि सुष्मिता सेन लवकरच लग्नाच्या बेडित ........ मुंबई प्रतिनिधी : आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी स...
आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी आणि सुष्मिता सेन लवकरच लग्नाच्या बेडित ........

मुंबई प्रतिनिधी : आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी सुष्मिता सेन सोबत असलेल्या नात्याची घोषणा केली आहे. ललित कुमार मोदींनी सुष्मिता सेनला माय बेटर हाफ असे संबोधल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे.त्यानंतर ललित कुमार मोदींनी स्पष्ट केले आम्ही लग्न केलं नाही फक्त डेट करत आहोत. लवकरच लग्नही होईल.
भारतात आयपीएलची मुहूर्तमेढ रोवण्यात त्यांचा पुढाकार होता पण नंतर ते वादांमध्ये अडकले. त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांना वेळोवेळी फेटाळून लावले आहे.ललित कुमार मोदींमुळे माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या देखील वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. ललित मोदींना ट्रॅव्हल डॉक्युमेंट उपलब्ध करून देण्यासाठी सुषमा स्वराज यांनी मदत केली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.ललित मोदी हे अनेकदा वादात अडकले आहेत. त्यांच्या वादग्रस्त कारकीर्दीवर टाकलेली एक नजर.
ललित मोदी कोणत्या वादात अडकले होते?
१ ] सर्वांत पहिल्यांदा ललित मोदी राष्ट्रीय बातम्यांमध्ये झळकले जेव्हा ते 2005 मध्ये अचानकपणे राजस्थान क्रिकेट संघाचे अध्यक्ष बनले. त्यावेळी भाजपची राजस्थानमध्ये सत्ता आली आणि त्यानंतर लगेचच ते क्रिकेट संघाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर ते बीसीसीआयचे उपाध्यक्ष बनले.
२ ] 2008 मध्ये त्यांनी आयपीएलची सुरुवात केली होती. ते आयपीएलचे पहिले कमिश्नर बनले. जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट लीग असा आयपीएलचा नावलौकिक बनला.
३ ] 2010 मध्ये नव्याने तयार करण्यात आलेली कोची टस्कर्स या टीमच्या मालकांचे प्रारूप ट्वीट द्वारे उघड केल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. कोची टस्कर्सच्या मालकांची नाराजी त्यांनी यामुळे ओढावून घेतली होती. या टीम मालकांपैकी एक नाव सुनंदा पुष्कर यांचे देखील होते. सुनंदा या तत्काली परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी होत्या. यानंतर शशी थरूर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
४ ] त्यानंतर आयपीएलमध्ये एकामागून एक भ्रष्टाचाराबाबत आरोपांच्या फैरी झडल्या. तसेच आयपीएलच्या प्रसरण हक्कांवरून देखील वाद निर्माण झाला होता. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा देखील ठपका होता, त्यांनी हे आरोप फेटाळले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत