शिंदे गटाकडून युवासेनेतही नवी नियुक्ती;सचिवपदावरुन वरुण सरदेसाईंची उचलबांगडी. मुंबई प्रतिनिधी : शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखा...
शिंदे गटाकडून युवासेनेतही नवी नियुक्ती;सचिवपदावरुन वरुण सरदेसाईंची उचलबांगडी.
मुंबई प्रतिनिधी : शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दुसरा डाव टाकला. युवासेनेचे राज्य सचिव वरूण सरदेसाई यांची युवासेनेतूनच उचलबांगडी करण्यात आली आहे. सरदेसाई हे रश्मी ठाकरे यांचे भाचे, अर्थात आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू आहेत. त्यामुळे हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबालाच धक्का मानला जातो. वरुण सरदेसाईंच्या जागी किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत किरण साळी?
किरण साळी हे गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. ते कोकणातील आमदार आणि माजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे ते निकटवर्ती असल्याची माहिती आहे. त्यांनी यापूर्वीही युवासेनेत काम केलं आहे. साळी यांनी युवासेनेचे राज्य सहसचिव म्हणून काम पाहिलं होतं. ठाकरे घराण्याला धक्का देण्यासाठी शिंदेंनी थेट वरुण सरदेसाई यांच्या जागी किरण साळी यांची नेमणूक केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी युवासेनेतून आपली राजकीय राजकीय कारकीर्द सुरु केली होती. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागली. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री, मुंबईचे पालकमंत्रिपद अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना आदित्य ठाकरे यांनी मावसभावाला युवा सेनेची जबाबदारी दिली होती. त्यामुळे युवासेनेलाही राजकीय दृष्ट्या महत्त्व आहे.
कोण आहेत वरुण सरदेसाई?
रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे सुपुत्र, अर्थात आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ
वरुण सरदेसाईंकडे ठाकरेंकडून युवासेनेचे राज्य सचिव म्हणून जबाबदारी
२०१७ मधील कल्याण डोंबिवली, मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये महत्त्वाची कामगिरी
ठाकरे सरकारमध्ये सरदेसाईंना 'वाय' दर्जाची सुरक्षा
वरुण सरदेसाई यांच्या कार्यशैलीवर यापूर्वीही पक्षातील काही जणांची नाराजी







कोणत्याही टिप्पण्या नाहीत