उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार ; दीपाली सय्यद यांच्या ट्वीटमुळे राजकारणात मोठा ट्विस्ट येणार...... मुंबई प्रतिनिधी ...
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार ; दीपाली सय्यद यांच्या ट्वीटमुळे राजकारणात मोठा ट्विस्ट येणार......
मुंबई प्रतिनिधी : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यामधील शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. आपलीच शिवसेना खरी असा दावा करणाऱ्या शिंदे गटाला मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आव्हान दिले आहेत. अशात मंत्रिमंडळाचा विस्तार न होण्यावरून टीका करणारे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी एकीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलेली असतानाच, दुसरीकडे शिवसेचेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मोठे विधान करत खळबळ उडवून दिली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच चर्चा करायला एकत्र येणार हे समजले असे दीपाली सय्यद यांनी म्हटेल आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भाजप नेत्यांनी केली मदत- दीपाली सय्यद
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी एकत्र यावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मदत केल्याचे सांगत दीपाली सय्यद यांनी भाजप नेत्यांचे आपल्या ट्विटमध्ये आभारही मानले आहेत.शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी रात्री उशिरा ट्विट करत ही माहिती दिली आहे. दीपाली सय्यद आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ' येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थीकरिता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद! चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत