Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

दारू पिऊन गाडी चालवण्याच्या आरोपाखाली एका कुत्र्याला बिहार पोलिसांनी केली अटक.हे प्रकरण नेमकं काय?

 दारू पिऊन गाडी चालवण्याच्या आरोपाखाली एका कुत्र्याला बिहार पोलिसांनी केली अटक.हे प्रकरण नेमकं काय? एकल न्यूज़ : दारू पिणं हे शरीरासाठी हानि...

 दारू पिऊन गाडी चालवण्याच्या आरोपाखाली एका कुत्र्याला बिहार पोलिसांनी केली अटक.हे प्रकरण नेमकं काय?


दारू पिऊन गाडी चालवण्याच्या आरोपाखाली एका कुत्र्याला बिहार पोलिसांनी केली अटक.हे प्रकरण नेमकं काय?

एकल न्यूज़ : दारू पिणं हे शरीरासाठी हानिकारक असतंं. दारुच्या व्यसनामुळे हृदय विकार, दमा, त्वचा रोग यांसारखे विविध आजार उद्भवू शकतात. त्यामुळे काही राज्यांमध्ये दारू बंदी कायदा करण्यात आला आहे. मात्र तरी देखील काही मंडळी लपून-छपून दारू खरेदी करतात. अहो, एवढंच नाही तर दारू पिऊन गाड्या देखील चालवतात. पण चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे दारू पिऊन गाडी चालवण्याच्या आरोपाखाली एका कुत्र्याला अटक करण्यात आली आहे. हा कुत्रा सध्या तुरुंगात बंद आहे. मात्र त्याला सांभाळून पोलीस देखील आता वैतागले आहेत.

pitambari


हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?


बिहार पोलिसांनी गाजीपूर बॉर्डरजवळ एक गाडी पकडली. या गाडीमध्ये रामसुरेश यादव आणि भुनेश्वर यादव नावाचे २ व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत ६ विदेशी दारुच्या बाटल्या घेऊन प्रवास करत होते. त्यांच्यासोबत एक जर्मन शेफर्ड कुत्रा देखील होता. या तिघांना ड्रिंक अँड ड्राईव्हच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. जेव्हा पोलिसांनी त्यांची चौकशी केली, तेव्हा त्यांनी आरोप फेटाळून लावले. उलट कुत्राच दारू पिऊन गाडी चालवत होता असा अजब दावा त्यांनी केला. मग पोलिसांनी आरोपींसोबतच त्या कुत्र्याला देखील अटक केली. सध्या हा कुत्रा तुरुंगात असून तो पोलिसांना त्रास देत आहे. या कुत्र्याला आवरायचं कसं? हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे.

sonai


या कुत्र्याला हिंदी भाषा कळत नाही. त्याला केवळ इंग्रजी कळतं. त्यामुळे त्याच्यासोबत संभाषण कसं करायचं हेच पोलिसांना कळत नाही. शिवाय या कुत्र्याला विशेष प्रकारचा कॉन्फ्लेक्स चिवडा आणि दूध लागतं. तो साधी बिस्किटं खात नाही. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्या कुत्र्याला सांभाळायचं कसं? हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. शिवाय आरोपी देखील कुत्रा गाडी चालवत होता या दाव्यावर ठाम आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी लांबवीवर गेलं असून पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place